Posts

Showing posts from March, 2026

कालची अंधश्रद्धा आजचे विज्ञान

        विज्ञानाचा आणि माझा संबंध तसा जुनाच, म्हणजे शाळेतल्या प्रयोगाच्या वहीत आकृत्या काढण्यापुरता! पण हल्ली विज्ञानाच्या नावावर जे काही चालतं, ते बघून वाटतं की विज्ञानाची स्वतःची स्मरणशक्ती थोडी कच्ची असावी. काल जे 'चमत्कार' म्हणून हेटाळलं गेलं, तेच आज 'टेक्नॉलॉजी' म्हणून खिशात घेऊन आपण फिरतोय. आमच्या लहानपणी जादूच्या गोष्टी ऐकताना वाटायचं की काचेच्या गोळ्यात जग दिसणारा तो जादूगर नक्कीच कोणत्या तरी तांत्रिक-मांत्रिकाचा नातलग असावा. तेव्हाचे रॅशनल लोक म्हणायचे, "असं कसं शक्य आहे? डोळे मिटून किंवा काचेत पाहून लांबचं कसं दिसेल?" आज तेच लोक हातात स्मार्टफोन घेऊन व्हिडिओ कॉलवर अमेरिकेच्या नातवाशी गप्पा मारतात आणि म्हणतात, "नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, चेहरा स्पष्ट दिसत नाहीये!" म्हणजे जादूगाराच्या काचेच्या गोळ्याला 'बँडविड्थ' नव्हती इतकाच काय तो फरक. विज्ञान तेव्हाही होतं, पण तेव्हा ते 'अंधश्रद्धा' नावाच्या कपाटात बंद होतं, कारण कोणाकडे इंटरनेटचा रिचार्ज नव्हता. ​दुसरा विषय म्हणजे रामायण-महाभारतातले ते बाण. एका बाणातून दहा बाण निघणे किंवा सम...

मल्टी टास्कींग की मल्टी रिस्कींग

 आजच्या या वेगवान जगात 'मल्टी-टास्किंग' हा शब्द एखाद्या देवमाणसासारखा पुजला जातो. जो एकाच वेळी पाच-सहा कामं करतो, तो जणू या युगाचा सुपरमॅन! पण खरं सांगायचं तर, हा सुपरमॅन अनेकदा स्वतःच्याच चड्डीत पाय अडकून तोंडावर पडताना दिसतो. माणसाला निसर्गाने एकच डोकं दिलंय, हे आपण सोयीस्करपणे विसरलो आहोत. आपल्याला वाटतं की आपण एकाच वेळी भाजी चिरू शकतो, ऑफिसचा कॉल अटेंड करू शकतो आणि पायऱ्याही उतरू शकतो. पण होतं असं की, आपण भाजीऐवजी बोट चिरतो, बॉसला 'आई' म्हणतो आणि पायऱ्यांवरून घसरून थेट खालच्या मजल्यावर लँडिंग करतो. हे 'मल्टी-टास्किंग' म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्याच पायावर स्वतःहून कुऱ्हाड मारून घेण्याची एक आधुनिक कला आहे. ​विशेषतः स्वयंपाकघरात जेव्हा एखादी गृहिणी (किंवा हौशी गृहस्थ) कानाला फोन लावून, तो खांद्याने दाबून धरत मल्टी-टास्किंगचा प्रयत्न करतात, तेव्हा तो एक थरारपटच असतो. एका बाजूला सासूबाईंशी गप्पा सुरू असतात आणि दुसऱ्या बाजूला फोडणीची तयारी. गप्पांच्या नादात मिठाऐवजी साखर वरणांत पडते आणि मग जेवताना अख्खं कुटुंब 'गोड वरण' खाऊन मल्टी-टास्किंगचे गोड ...